परंडा, दि . ०५: धनंजय गोफणे
श्री संत दत्तूजी महाराज पालखी सोहळा जवळा (प),ता.शेगाव जि.बुलढाणा पायदळ दिंडी वारीचे कपिलापुरीमध्ये दि.४/७/२०२२ सकाळी ठीक ७ वाजता आगमन झाले.अभंग व गोवळणीच्या सुरात संपुर्ण कपिलापुरी गाव दुमदुमुन निघाले.
महादेव दशरथ पाटील यांच्या स्वगृही श्रीच्या मूर्ती,पादुका अभिषेक रणजीत महादेव पाटील,
अनुराधा रणजीत पाटील या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आला.तसेच आण्णासाहेब जाधव यांच्या वतीने ३२५ वारकऱ्यांना चहा वाटप करण्यात आले.समस्त ग्रामस्थ कपिलापुरी यांच्या वतीने अरिहंत मंगल कार्यालय कपिलापुरी येथे वारकऱ्यांना अंघोळ व जेवणाची सोय करण्यात आली.
हा पालखी सोहळा संपन्न करण्यासाठी
रणजीतकुमार जैन,रणजीत पाटील,राहुल पाटील,वैभव आवाने,पृथ्वीराज जाधव,गुणपाल जैन,मुकेश आवाने, सन्मती उपाध्ये, भरतेश मसलकर,धनराज कुंभार,किरण पिंपरकार, बाहुबली जैन,जयघोष आवाने, संतोष डाके, सागर बोडरे,परशराम पाटील,आंबदास डाके, बाळासाहेब काशीद,बिभिषण कुंभार, ज्योतिराम कुंभार आदीनी परिश्रम घेतले.पालखी चालक सोपान महाराज खोंड यांनी समस्त गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.दुपारी ठीक १२ वाजता पालखी प्रस्थान कपिलापुरीहुन वाघेगव्हाण मार्गे बारलोणीकडे झाले.