नळदुर्ग , दि . ०३
नळदुर्ग येथील गोलाईमध्ये तूळजापुर मार्गावर धाराशिव-५५ कि.मी असा दिशा दर्शक फलक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावला आहे,
मागच्या महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतरला मंजूरी दिल्यानंतर जिल्ह्यात मोठा जल्लोष करण्यात आला होता,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नळदुर्ग शहरातील गोलाई येथे तूळजापुर रस्त्यावर धाराशिव-५५ कि.मी. असा दिशा दाखविणारा फलक लावला आहे,
यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहर सचिव प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवि राठोड,मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण,संदीप वैद्य,दिलीप राठोड आदि उपस्थित होते.