सोलापूर : दि.०३
सोलापुरातील निरूपणकार रंगाभाऊ कुलकर्णी यांचे शनिवारी (दि.२जुलै) रोजी पहाटे १:३० वा.सु निधन झाले. सद्गुरु नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालवली जाणारी अध्यात्मिक चळवळ सोलापूर शहर - जिल्हा परिसरात मोठ्या प्रमाणावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात त्यांचा सहभाग होता. शांत, मनमिळावू आणि धार्मिक असा त्यांचा स्वभाव होता, त्यांच्या अशा अकाली जाण्याने श्रीसदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली जात आहे. जुळे सोलापूर येथील ओंकार अपार्टमेंट येथे ते राहावयास होते. गुरुवारी रात्री एका वाहनांच्या धडकेत त्यांच्या मेंदूला मोठा मार लागला होता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली.
शनिवारी दुपारी बाराच्या दरम्यान मोदी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.