नळदुर्ग ,दि . ०३
प्रतिवर्षा प्रमाणे नळदुर्ग शहरातील आदर्श शिक्षक श्री.वसंतराव अहंकारी यांच्या निवासस्थानी भागवत सप्ताहाचे आयोजन केलेले आहे.
भागवत कथाकार वेद.शास्त्र संपन्न श्रीराम जोशी महाराज ( रा - केज ) यांच्या अमृतवाणीने भागवत कथा सात दिवस सांगितली जाते.
दिनांक 7 जुलै ते 13 जुलै दरम्यान ह्या भागवत सप्ताहाचे आयोजन केलेले आहे.
दररोज सकाळी 7 ते 10 दरम्यान भागवत संहिता संस्कृत मध्ये वाचली जाते..दुपारी 3 ते 6 दरम्यान भागवत कथा मराठीत सांगितले जाते..दि. 11जुलै रोजी सायं 6 वाजतां गोपाळकाला केला जातो..दि. 13 जुलै गुरुपौर्णिमा दिवशी ह्या सप्ताहाची समाप्ती आहे..यावेळी शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.
तरी सर्व भाविकांनी ह्या भागवत सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री.बाबुराव अहंकारी, श्री.वसंतराव अहंकारी, श्री.बळवंत अहंकारी, श्री.विकास अहंकारी ,श्री. वैभव अहंकारी, श्री.योगेश अहंकारी ,श्री.सुनील पाटील व नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले आहे.