वागदरी , दि. ०२ : एस.के.गायकवाड:
पंचशील बुद्ध विहार तथा विपश्यना केंद्र दस्तापूर (आष्टा मोड) ता.लोहारा येथे विक्रीकर विभाग पुणे येथे सहाय्यक आयुक्त म्हणून सेवेत कार्यरत असलेले डॉ. विकास डावरे व त्यांच्या सुविद्यपत्नी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी , प्रबंधक बार्टी पुणे; इंदिरा विकास डावरे यांचा पंचशील बुद्ध विहार तथा विपश्यना केंद्र दस्तापूर येथे सदीच्छा भेट देण्यासाठी आले असता येथील पंचशील बुद्ध विहार तथा विपश्यना केंद्रातच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून विकास डावरे व इंदिरा डावरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना बार्टीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा डावरे यांनी बार्टीच्या मार्फत मागासवर्गीयाकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी पंचशील बुद्ध विहार व विपश्यना केंद्राचे अध्यक्ष अरुण लोखंडे, सदस्य अंबादास डावरे, बालाजी डावरे, रमेश गायकवाड, बंटी डावरे, आरविंद लोखंडे, रमेश लोखंडे, हरीष डावरे, अर्जुन गायकवाड, चंद्रमनी डावरे,अमर डावरे, प्रशांत डावरे, शुभम डावरे आदी उपस्थित होते.