काटी , दि . ०२
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सामाजिक विकास उपक्रमा अंतर्गत मदुरा मायक्रो फायनान्स लिमिटेड आणि क्रेडिट ऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित येथील तीन
अंगणवाडीतील बालकांना प्रत्येक अंगणवाडीस लहान 20 खुर्च्या, ४ मोठ्या खुर्च्या, दोन सतरंज्या सरपंच आदेश कोळी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना ग्रामीण भागातील बालकांचा विकास व्हावा या दृष्टीने मदुरा मायक्रो फायनान्स लिमिटेड आणि क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबवून ग्रामीण भागातील बालकांना आधार देण्याचा प्रयत्न केला असून ग्रामीण भागातील अंगणवाडीतील बालकांना आर्थिक परिस्थितीमुळे अशा सुविधा मिळणे अशक्य असते. त्यामुळे राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. याप्रसंगी मदुराचे विभाग प्रमुख महादेव हत्ती यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आर.बी.आय.मान्यताप्राप्त मदुरा कंपनी ग्रामीण व निमशहरी भागातील मध्यम व गरजू महिलांच्या व्यावसायिक व आर्थिक वृद्धीसाठी उत्तम सेवा देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिली असून सामाजिक बांधिलकीतून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या महिलांना त्यांचा उद्योग वाढीसाठी तसेच नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अर्थ सहाय्य मदुरा मायक्रो फायनान्सचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सरपंच आदेश कोळी, माजी सरपंच अशोक जाधव, पत्रकार उमाजी गायकवाड, मदुराचे विभाग प्रमुख महादेव हत्ती, मदुराचे शाखाधिकारी शिवराम तोडकर, सचिन कोळी, भार्गव गांगुल, प्रशांत सुरवसे, उमाकांत लवटे,दत्ता घायाळ, विलास सपकाळ यांच्यासह विद्यार्थी, पालक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यक, महिला बचत गटातील सदस्या आदी मान्यवर उपस्थित होते.