जळकोट , दि. ०२
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी प्रतिमेचे पूजन करून गावातुन घोषणा देत फेरी काढण्यात आली.त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या वतीने येथील शाळेतील विद्यार्थ्यांना वही,पेन, वाटप करण्यात आले.तसेच ग्रामपंचायतीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच ज्योतीका चव्हाण, अमृता चव्हाण, पांडुरंग चव्हाण,थावरु राठोड, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील, विनायक चव्हाण,ताराचंद राठोड,शंकर राठोड, शिवाजी चव्हाण, गणपती राठोड, राजाराम पवार, देविदास चव्हाण, मोतीराम राठोड, यशवंत राठोड, किरण चव्हाण, हरिदास राठोड, रेश्मा चव्हाण,रिना चव्हाण यांच्या सह शाळेतील शिक्षक नागेंद्र गुरव, सुरेश कोकाटे,मुखम, कार्लै, किशोर पाटील,देवानंद पांढरे,कांबळे,आदि उपस्थित होते.