नळदुर्ग, दि . ०१

 माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक  यांच्या १०९ व्या जयंती निमित्त वडाचा तांडा ता. तुळजापूर येथे विविध उपक्रमाने राबविण्यात आले. 

 लोहारा रोडवर वसंतराव नाईक चौकची स्थापना करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक  यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील पाळीव जनावरांना पावसाळ्यात होणारे घटसर्प,फऱ्या,हगवण इत्यादी आजारावर मान्सूनपूर्व लसीकरण करणे गरजेचे असल्याने गावातील लहान मोठ्या अशा पाळीव जनावरांना लसीकरण करण्यात आले.

त्याचबरोबर वसंतरावजी नाईक  यांच्या प्रतिमेचे पूजन करून शेतकरी लखन चव्हाण यांच्या शेतामध्ये कृषी दिन साजरा करताना गावातील २० शेतकऱ्यांना तूर बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मिळणाऱ्या विविध योजनाची माहिती कृषी सहाय्यक माने  यांनी दिली. यावेळी त्यांचा  ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. उपस्थित शेतकरी यांना सोयाबीन, तूर ,उडीद इत्यादी पिकांवर फवारणी करण्यासाठी सुरक्षा किटचे वाटप करुन किट वापराबद्दल माहिती देण्यात आली.

 त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ  वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच विजया चव्हाण, उपसरपंच निमाबाई राठोड, सदस्य ललिता चव्हाण ,चांगुना चव्हाण ,लखन चव्हाण ,कृषी सहाय्यक माने  ,ग्रामसेवक सी आर अवैया ,मंडळाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, प्रदीप चव्हाण ,प्रवीण चव्हाण ,विजय चव्हाण शाहूराज चव्हाण ,पृथ्वीराज राठोड, धोंडीराम राठोड, अरविंद चव्हाण, अमित चव्हाण, जयराम चव्हाण ,फुलचंद चव्हाण ,अजय चव्हाण आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top