नळदुर्ग, दि. २२: 

नळदुर्गहुन  श्री क्षेञ अक्कलकोट जाणा-या रस्त्यावर  दिशादर्शक फलक नसल्याने प्रवाशी वाहनचालका भक्ताची गैरसोय होत असुन तातडीने संबधित विभागाने दिशादर्शक फलक लावण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

शहरातील  राष्ट्रीय महामार्गावरुन दररोज असंख्य पर्यटक व भक्त हे नळदुर्ग किल्ला,श्रीक्षेत्र तूळजापुर,व श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे दर्शन घेण्यासाठी जात असतात,व. नळदुर्ग बसस्थानकच्या बाजूस दुतर्फा अक्कलकोटकडे जाण्याचा मार्ग दर्शविणारे फलकच नसल्याने भक्तामध्ये संभ्रम निर्माण  होत आहे.रात्रीच्या वेळेस तर कोणीही मार्ग सांगण्यासाठी नसते,अशावेळी त्यांना मार्ग समजन्यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापुरचे कार्य.अभियंते  संतोष कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.
 
Top