वागदरी , दि . ०९
: वागदरी ता.तुळजापूर येथील शशांक धन्यकुमार बिराजदार यांची नवोदय विद्याल्यात पुढील शिक्षणाकरिता निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले धन्यकुमार बिराजदार यांचे चिरंजीव शशांक बिराजदार हा श्रीश्री रविशंकर इंग्लिश मेडीयम स्कुल अणदूर ता.तुळजापूर येथे सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात इ.५ वी मध्ये शिकत असताना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी घेण्यात येणारी पूर्व परिक्षा दिली होती. त्या परिक्षेत तो मेरिटचे गुण मिळवून यश संपादन केले असून पुढील शिक्षणाकरीता नवोदय विद्यालयासाठी त्यांची निवड झाली आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.