मुरूम दि.११, 

आषाढी एकादशीनिमित्त मुरूम येथील विठ्ठलसाईच्या माळरानावर विठ्ठल-रुखमाई मंदिरात भक्तांच्या मांदियाळीत विठ्ठल-रुखमाईचे भक्तीभावाने श्री.विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्यध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. 


यावेळी उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील,बाळासाहेब पाटील,संचालक माणिक राठोड उपस्थित होते. मुरूम येथील विठ्ठल-रुखमाई मंदिर प्रति पंढरपूर व त्याचबरोबर विठोबाचे माळ या नावानी जाणिले जाते. मुरूम व परिसरातील वारकरी, आषाढी एकादशी,जत्रेला माळावर भाविक-भक्तांची मांदियाळी भरते. मुरूम व परिसरातील नागरिक प्रति पंढरपूरला पायी चालत येऊन आणि विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेतात.


 यावेळी मंदिर परिसरात जणू वारकऱ्यांची मांदियाळी भरलेले दृश्य दिसून येते. आषाढी एकादशी निमित्त विठोबा माळावरील विठ्ठल-रुखमाई मंदिरात दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविक-भक्तांच्या रांगा दिसून आल्या, दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अतिशय भक्तिमय वातावरणात पाटील परिवाराच्या हस्ते पूजन करण्यात आले व त्याच बरोबर दर्शनासाठी आलेल्या भाविक-भक्तांना उपवासाचे फराळीचे प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी कारखान्याचे एम डी अथणी, मुरूम पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ.रंगनाथ जगताप,माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, उल्हास घुरघुरे, महेश माशाळकर, महालिंग बाबशेट्टी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व भाविक-भक्तांना बसवराज पाटील यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
 
Top