परंडा, दि . ११


परंडा येथील खंडेश्वर इंग्लीश मिडीयाम स्कुलच्या वतीने आषढी एकादशी निमित्त  भव्य दिंडी काढण्यात आली.  विद्यार्थ्यांनी  ज्ञानोबा तुकाराम गजर करीत येणाऱ्या जाणार्‍यांचे लक्ष वेधले.  अतिशय उत्साहात  हा सोहळा पार पडला .


खंडेखर इंग्लीश मिडीयम स्कुलचे मुख्यध्यापक संजय जाधव , पठाण लदसूम, अर्चना बनसोडे, प्रियंका डिसले, मंजुषा भांगे, वर्षा गरड, विभुते  व पोळ  यांनी पुढाकार  घेतले.

 
अतिशय कौतुकास्पद विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाचा गजर करीत ठेका धरला होता. सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी वारक-याच्या भुमिका पार पाढल्या व विठ्ठल रुक्मीनीचे पात्र अतिशय सुंदर तयार करण्यात आले होते.
 
Top