तुळजापूर, दि. १० :


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ लता शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी रात्री उशिरा महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. मंदिर संस्थांनच्या वतीने विश्वस्त आमदार राणाजगजितसिह  पाटील यांनी शिंदे कुटुंबीयांचा सत्कार केला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा करण्यासाठी येण्यापूर्वी त्यांचे कुटुंबीय महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल झाले. तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय यांची पंढरपूर येथे भेट झाली आणि कुटुंबीयांनी शासकीय पूजेमध्ये सहभाग नोंदवला. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे , चिरंजीव श्रीकांत शिंदे , एकनाथ शिंदे यांच्या सून आणि नातू या सर्वांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर प्रशासकीय कार्यालयात त्यांचा मंदिर संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

मंदिराच्या बाहेर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ अर्चना पाटील यांनी सौ लता शिंदे यांचे  स्वागत केले. याप्रसंगी तुळजापूर शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top