नळदुर्ग , दि . १८ : विलास येडगे

 सिंदगाव ता. तुळजापुर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित श्री दत्त शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला असुन या पॅनलचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी झाले आहेत.
      

सिंदगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक दि.१७ जुलै रोजी पार पडली. ही निवडणुक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित श्री दत्त शेतकरी विकास पॅनल व कृषी ग्राम विकास आघाडी पॅनल या दोन पॅनेलमध्ये अतीशय चुरशीची दुरंगी लढत झाली. या निवडणुकीत श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली असुन या पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकत कृषी ग्राम विकास पॅनलचा अक्षरशा धुव्वा उडविला आहे. श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख सरपंच विवेकानंद मेलगिरी, मलप्पा पाटील, श्रीपत ताडकर, सुरेश बिराजदार व जाकीर शेख यांनी अतीशय नियोजनबद्ध निवडणुकीची तयारी केली असल्यानेच श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला.

या निवडणुकीसाठी दि.१७ जुलै रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत एकुण ४८४ मतदारांपैकी ४४० मतदान झाले होते. मतदान पार पडल्यानंतर लगेच मतमोजणी घेऊन निकाल जाहीर करण्यात आला.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन के. एस.बोनदर
 यांनी काम पाहिले त्यांना सुधीर पुराणिक यांनी सहकार्य केले.
        

 श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. काशिनाथ भोसले (२३८),रेवाप्पा बेडजीरगे (२४२),श्रीकांत बिराजदार (२३८),राजेंद्र करंडे (२४२),सिद्धाराम परशेट्टी (243),ज्ञानेश्वर रेड्डी (२४५),बसय्या स्वामी (२४५),महम्मद शेख (२४१),दत्तू शिंदे (२५४),लक्ष्मीबाई बनजगोळे (२५०),अंबुबाई सुरवसे (२५३),दत्तात्रय ताडकर (२५७),व बलभीम पांढरे (२५०)  विजयानंतर श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या समर्थकांनी गावात फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून एकच जल्लोष केला.
 
Top