नळदुर्ग ,दि.०१ :
प्रशासनास वेठीस धरुन महसुल विभागाच्या व पोलीस विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांस धक्काबुक्की करुन त्यांच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा केल्याप्रकरणी निलेगाव ता.तुळजापूर येथिल ग्रामसेवक संजय रामचंद्र घोगरे, रा. सोलापूर यांच्या फिर्यादीवरुन आठजणाविरुध्द नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामसेवक संजय रामचंद्र घोगरे यानी दिलेल्या फिर्यादीनुसार 1)दगडु दुधभाते 2)नामदेव दुधभाते 3)पिंडु दुधभाते 4)हणुमंत सोनटक्के 5)शंकर जमादार 6)बसवराज जमादार 7)निर्मलाबाई मोरे 8)माळाप्पा बंदीछोडे, सर्व रा. निलेगाव, ता. तुळजापूर या आठजणाविरुध्द गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत.
तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथिल ग्रामस्थ- मालु दुधभाते, वय 75 वर्षे हे मयत झाल्याने त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेत न करता तो पुर्वीप्रमाणे चालत आलेल्या जागेतच अंत्यविधी करण्याचा आग्रह मयत- मालु दुधभाते यांच्या नमूद नातेवाईकांनी धरला होता. यावर दुधभाते कुटूंबीयांसह निलेगावचे ग्रामसेवक- संजय घोगरे यांसह महसुल पथकाचे अधिकारी- कर्मचारी व नळदुर्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी- अंमलदार यांनी मयताचे नातेवाईकांस समजावून सांगीतले. परंतु त्यांनी प्रशासनाचे म्हणने न ऐकता प्रशासनास वेठीस धरुन महसुल विभागाच्या व पोलीस विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांस धक्काबुक्की करुन त्यांच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक दि. 30.07.2022 रोजी 11.30 वा. ते 14.45 वा. दरम्यान अडथळा केला. अशा मजकुराच्या ग्रामसेवक- संजय घोगरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरवेरुन वरील आठजणाविरुध्द गु.र.न. 239/ 2022 भा.दं.सं. कलम- 353, 186, 34 नुसार
गुन्हा नोंदवला आहे.