नळदुर्ग,दि.१२  एस.के.गायकवाड:

 स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवा निमित्ताने नळदुर्ग  येथील पोलीस ठाणाच्या वतीने बालाघाट काँलेज नळदुर्ग येथे दि.१३ आँगस्ट  रोजी सकाळी १०.३० वाजता तालुकास्तरिय आंतरशालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा  व फँन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


   दि.१५ आँगस्ट २०२२ रोजी देश स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून हे वर्ष आजादी का अमृत  महोत्सवी वर्ष म्हणून संबंध देशभर विविध उपक्रमाने साजरा केला जात आहे. त्यचाच भाग म्हणून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या वतीने बालाघाट शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग  ता.तुळजापूर येथे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दोन गटात तालुकास्तरिय आंतरशालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यातील सुप्त गुणाना वाव मिळावा. या उद्देशानेच वक्तृत्व व फँन्सी ड्रेस स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले असून इयत्ता  ८ वी ते १० वी विद्यार्थ्यांचा पहिला एक गट करण्यात आला आहे. त्यांच्याकरिता भाषणाचे दोन विषय आहेत. विषय क्रमांक-१ भारतीय स्वातंत्र्याचा लढा व विषय क्रमांक-२सोशल मीडिया आणि समाज हे आहेत. तर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भाषणाचे दोन विषय आहेत.विषय क्रमांक १ नैतिकमूल्य शिक्षण काळाची गरज तर विषय क्रमांक २ स्वातंत्र्याचे ७५ वर्षे: काय कमावले काय गमावले या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. तरी तुळजापूर  तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे स.पो.नी.सिध्देश्वर गोरे यांनी केले असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मो.न. ७०५८९८८०९८, ८६०५००३५१५ या क्रमांकावर अनुक्रमे पो.काँ.पोतदार व पो.काँ. वाघमारे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top