काटी , दि . ११

तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील मॉडर्न हायस्कूल मध्ये हरित क्रांती उपक्रमाअंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग, तुळजापूर यांच्या वतीने बियांपासून राखी बनवून ही राखी शाळेच्या परिसरातील  वृक्षाला बांधून नात्यांच्या जपवणूकीसह पर्यावरण रक्षणाचा संदेश देऊन अनोखी राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. 



दरवर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या पोर्णिमेच्या दिवशी राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येतो. यंदा गुरुवार दि.11 रोजी आलेल्या राखी पौर्णिमा या सणाच्या पवित्र दिवशी बहिणीने भावाला प्रेमाचे बंधन म्हणून राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.रक्षाबंधनच्या काळामध्ये अनेकदा प्लास्टिकच्या किंवा पर्यावरणाला घातक अशा राख्या बाजारामध्ये उपलब्ध असतात. या राख्या दिसायला आकर्षक असतात. मात्र, या राख्यांमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी होते. याच गोष्टीकडे लक्ष देऊन हरित क्रांती उपक्रमाअंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एम. पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण विभाग, तुळजापूर यांच्या वतीने पर्यावरण पूरक सीड राखीची संकल्पना मनात ठेवून अशाच पवित्र बंधनाला आणखीन दृढ करण्यासाठी आणि पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी बियांपासून राखी बनवून ती राखी शाळा परिसरातील वृक्षाला बांधून अनोखी राखी पौर्णिमा साजरी करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
        


यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एम.पुंड, वनपाल एस.एम.पांचाळ, कर्मचारी डि.ई. राऊत,साधु शिंदे, शाळेचे मुख्याद्यापक एस.आर.आवारे, जे.ए.उंबरे, डी.एम.कादे,डि.ए. गुरव, ए.पी.गोडगे, एस.बी.लटके, ए.डी.काळे, बी.बी.सरवदे,आण्णा जाधव, एम.एम.शेळके यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top