नळदुर्ग ,दि. १२ 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नळदुर्ग येथिल ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे.

 

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सध्या  सर्वञ भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथे  शुक्रवारी  किल्ल्यात जाणा-या मुख्य प्रवेशव्दारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आले आहे.यामुळे किल्ल्याचा मुख्यप्रवेशव्दार राञीच्यावेळी तिरंगामय दिसत आहे.त्याचबरोबर किल्ल्यातील उपलीबुरुज, नव बुरुज, बारादरी यासह अन्य ठिकाणी विद्युत रोषणाईने सजविण्याचे काम युनिटी कंपनीच्या वतीने युध्द पातळीवर सुरु आहे.

युनिटी कंपनीचे मुख्य संचालक कफिल मौलवी , संचालक जयधवल करमरकर , संचालिका वैशाली जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.त्याचबरोबर किल्ल्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे बोलताना युनिटीचे मुख्य संचालक कफिल मौलवी यांनी सांगितले .
 
Top