उस्मानाबाद, दि . १३ :
कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगीरी करणा-या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा पोलिस मुख्यालयात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देउन गौरव करण्यात आला.
उस्मानाबाद पोलीस दलातील पोलीसांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याच्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या पोलीसांचा सत्कार केला जात असून जुलै 2022 या महिन्यात 1)बेस्ट पोलीस स्टेशन- कळंब पोलीस स्टेशन 2) बेस्ट उपविभाग- कळंब उपविभागाचे सहायक पोलीस अधिक्षक श्री एम. रमेश 3)चांगला तपास- उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पोनि- श्री. उस्मान शेख, सपोनि- एस.एम. सुर्वे, बी.आर. कांबळे, पोलीस अंमदार- एम.व्ही. शिंदे, आर.बी. पठाण, यांनी उस्मानाबाद (श.) पो.ठा. गुरनं 190/2022 भा.दं.सं. कलम 454,380 हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला 4)चांगली दोषसिध्दी- लोहारा पो.ठा. चे पोलीस अंमलदार- सचिन शेवाळे, उमरगा पो.ठा. चे पोलीस अंमलदार- गोवर्धन मुसळे यांनी लोहारा गुरनं 27/2018 भा.दं.सं. कलम 302 या खूनाच्या गुन्ह्यात अपराध सिध्दी करीता योगदान दिल्याने आरोपीस मा. न्यायालयाने जन्मठेप व 50,000 ₹ दंडाची शिक्षा सुनावली 5)समन्स- वॉरंट तामील- उस्मानाबाद (ग्रा.) व बेंबळी पो.ठा. चे पोलीस अंमलदार- आर.एस. चव्हाण व व्ही.आर. पेठे 6)चांगले सीसीटीएनएस काम- तुळजापूर पो.ठा. चे पोलीस अंमलदार- एस.डी. अनंतवाड, एस.एम. पवार 7)चांगला मुद्देमाल हस्तगत- स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि- श्री. शैलेश पवार, पोलीस अंमलदार- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, रविंद्र आरसेवाड, महेबुब आरब यांनी उस्मानाबाद (श.) गुरनं 190/2022 भा.दं.सं. कलम 454,380 या चोरीच्या गुन्हयात 9,16,500 ₹ किंमतीचे सुवर्ण दागिने जप्त केले 8)चांगला मुद्देमाल निर्गती- वाशी पो.ठा. चे पोलीस अंमलदार- एस.एच. तांबडे, अशोक करवर यांनी एकूण 87 गुन्ह्यातील मुद्देमालाची निर्गती केली 9)जास्तीत- जास्त मिसिंग निर्गती- आनंदनगर पो.ठा. च्या पोलीस अंमलदार- नदाफ यांनी 4 मिसींग प्रकरणाचा तात्काळ शोध घेतला 10)जास्तीत- जास्त प्रतिबंधक कारवाई – कळंब पो.ठा. चे पोनि- श्री. यशवंत जाधव यांनी 189 आरोपीतांवर प्रतिबंधक कारवाई केली 11)बेस्ट कम्युनिटी पोलीसिंग- उस्मानाबाद (श.) चे पोलीस अंमलदार- एस.एस. स्वामी, ए.डी. सारफळे यांनी चांगली कामगिरी केली 12) चांगले कामकाज करणारे पोलीस- तुळजापूर पो.ठा. चे पोनि- श्री. अजीनाथ काशीद, सपोनि- श्री. व्ही.एस. चासकर, पोउपनि- श्रीमती पवार, पोलीस अंमलदार- राऊत, भागवत, सावरे, माळी यांनी शस्त्र कायदा कलम- 4/25 च्या गुन्ह्यासह महाराष्ट्रातील 15 गुन्हे उघडकीस आणले. 13)चांगला प्रतिसाद डायल 112- नळदुर्ग पो.ठा. चे सपोनि- श्री. एस.आर. गोरे 14)बेस्ट क्लर्क- श्रीमती एस.एच. येरमे वरिष्ठ श्रेणी लिपीक, लेखा शाखा यांनी वेतन-3 या कार्यासनाचा पदभार वेळेत पारपाडून चांगली कामगिरी केली.
वरील सर्व पोलीस अधिकारी, अमंलदार व लिपीक यांचा आज दि. 12 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयातील सभागृहाते मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देउन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी- अंमलदार उपस्थित होते.