नळदुर्ग, दि .१३
शहरातील स्वातंत्र्य सैनिक व देश सेवा केलेल्या माजी सैनिकाचा युनिटी कंपनीच्या वतीने नळदुर्ग येथिल इतिहास प्रसिद्ध किल्ल्यात सोमवार दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षांनिमित्त सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्यांच्या 75 व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून युनिटी मल्टीकॉन्स कंपनी सोलापूरच्या वतीने नळदुर्ग शहरातील स्वतंत्र सैनिक माजी सैनिक यांचा सत्कार आयोजित केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक भास्करराव मोहरीर, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, युनिटी कंपनीचे मुख्य संचालक कफिल मौलवी, मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या शुभहस्ते, प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ नागरिक शिवाजी मोरे, माजी नगरसेवक शहबाज काझी, नय्यर जहागीरदार, नितीन कासार, उदय जगदाळे, मुस्ताक कुरेशी, शफी शेख, महालिंग स्वामी, बसवराज धरणे, कमलाकर चव्हाण, माजी नगराध्यक्ष शबीरअली सावकार,इमाम शेख , दिलीप कुलकर्णी, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवाज काझी, भाजप शहराध्यक्ष भिमाजी घूगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मेहबूब शेख, दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्रा मुळे, शहर काँग्रेस महिला अध्यक्षा कल्पना गायकवाड, मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, मनसे शहराध्यक्ष अलीम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, एम.आय.एम शहराध्यक्ष गौस रजवी, भाजपचे युवा नेते सुशांत भूमकर, शिवसेनेचे सरदारसिंग ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते अजहर जहागीरदार, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, आदिची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नळदुर्ग किल्ल्यात आयोजित केलेल्या सत्कार सोहळास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन युनिटी कंपनीचे मुख्य संचालक कफिल मौलवी, जयधवल करकमकर, संचालिका वैशाली जैन यांनी केले आहे.