काटी , दि. १३
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील निवृत्त शिक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम खेलाजी आगलावे वय 80 वर्षे यांचे सोलापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेले असता त्यांचे उपचारापुर्वीच हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. हि घटना शनिवार दि. 13 रोजी दुपारी एक वाजता घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, तीन विवाहित मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.
कॉंग्रेस पक्षाचे काटी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा निवृत्त आदर्श शिक्षक मोतीराम आगलावे यांना सामाजिक कार्याची विशेष आवड होती. सदैव समाजकारणात सक्रीय राहुन नवीन पिढीतील कार्यकर्त्यांना लोकहिताची कामे करण्यासाठी ते नेहमी प्रोत्साहित करीत होते. त्यांच्या अकाली निधनाने काटी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.