काटी, दि. १३
काटीता.तुळजापूर येथील विठ्ठल भजनी मंडळ,माळी गल्ली येथे शुक्रवार दि १२ ते शुक्रवार दि.१९ या कालावधीत श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.
दि.१२ रोजी हभप मोहन महाराज जायफळकर,दि.१३ रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज डाके,दि.१४ रोजी हभप कुमार महाराज केमधारणेकर,दि.१५ रोजी हभप विजय महाराज काशिद,दि.१६ रोजी हभप बापुसाहेब महाराज ढगे,दि.१७ रोजी हभप ऋषिकेश महाराज जोशी,दि.१८ रोजी हभप सुनील महाराज ढगे यांची किर्तन सेवा होणार असून शुक्रवारी दि.१९ रोजी काल्याचे किर्तन हभप सुनील महाराज ढगे यांचे होणार आहे.तरी भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.