काटी , दि.१४

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तथा उस्मानाबाद  जिल्हा परिषद सदस्या सक्षना सलगर यांनी रविवार 14 ऑगस्ट रोजी तुळजापूर तालुक्यातील कुंभारी गावास सदिच्छा भेट देऊन ग्रामस्थांसोबत विविध विकास कामासंदर्भात संवाद साधला.
     


कुंभारी येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व हेमाडपंथी महादेव मंदिर,विठ्ठल रुक्मिणी मंदिर व पाणी पुरवठा विहिरीस त्यांनी  भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या सूचनेनुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू असे आश्वासन  त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा संगीता काळे  व शहर कार्याध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेस कमल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.


 यावेळी सरपंच नाना कोळी,राष्ट्रवादी काँग्रेसचे रुबाब पठाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महिला व युवा कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती होती.
 
Top