मुरूम, ता. उमरगा, दि. २१ :
डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या ९ व्या स्मृती दिनानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व श्री माधवराव पाटील महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात शनिवारी (दि.२०) रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य प्रविण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. किरण राजपूत, डॉ. प्रतापसिंग राजपूत, सेवानिवृत्त प्रा. राजकुमार दलाल, डॉ. मुकुंद धुळेकर, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. नरसिंग कदम, ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे, डॉ. अरविंद बिराजदार, डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. सोमनाथ बिरादार, डॉ. राजू शेख, डॉ. महादेव कलशेट्टी, प्रा. दयानंद बिराजदार, प्रा. अशोक बावगे, राजू ढगे, महादेव पाटील, सुभाष पालापूरे, लालअहमद जेवळे, महेश लिमये, सगरे पेंटर आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचलन व आभार डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी मानले.