नळदुर्ग ,दि. १४ :
शहरातील व्यापारी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अतुल हजारी तर उपाध्यक्षपदी दयानंद स्वामी यांची निवड करण्यात आली आहे.
शनिवार दि .13 रोजी व्यापारी गणेश मंडळाची बैठक मल्लिकार्जुन मंदिर सभागृहात मावळते अध्यक्ष राजेंद्र महाबोले यांच्या अध्यक्षतेखाली होवुन नुतन कार्यकारणीची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.
अध्यक्ष अतुल सुनिलसिंह हजारी ,उपाध्यक्ष दयानंद शंकरय्या स्वामी, कोषाध्यक्ष संतोष रामचंद्र मुळे , सदस्य सुधीर पाटील, मुकुंद नाईक , सतीश पुदाले,वैजनाथ कोरे ,शंतनू डुकरे ,उमेश नाईक ,बसवराज धरणे ,राजकुमार खद्दे ,राजू पिचे ' सलागार आधारस्तंभ अशोकराव पुदाले , खंडेशा कोरे, सांबप्पा धरणे, मोहन नाईक , सुभाष कोरे, आदीची निवड करण्यात आली आहे.