वागदरी ,दि.०८:

तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे देश स्वातंत्र्याच्या आमृत मोहत्सवानिमीत्ताने शालेय विद्यार्थी व ग्रामस्थानी तिरंगा रँली काढून हर घर तिरंगा या आभियानाविषय जाणिव जागृती केली.
  

येथून जवळच अंतरावर असलेल्या धरीत्री विद्यालय आपलं घर आलीयाबाद (नळदुर्ग) जि.प.प्राथमिक शाळा येडोळा व येथील अंगणवाडी विद्यार्थ्यांची धरीत्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता शहा,जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राहुल जाधव,सरपंच पद्माकर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली देश स्वातंत्र्याच्या  मोहत्सवानिमीत्त हर घर तिरंगा आभियानाविषयी जाणीव जाग्रती करण्यासाठी गावातील मुख्य रस्त्यावरुन तिरंगा रँँली काढण्यात आली.
  

याप्रसंगी धरीत्री विद्यालयचे सहशिक्षक एम.ए.कोकणे,युवराज होळे,सुभांगी कारंजे, जि.प.प्राथमिक शाळेतील सहशिक्षक बनसोडे ,स्वामी , महाबोले ,अंगणवाडी कार्यकर्ती शितल लोंढे, मदतनीस शोभा लोमटे, उपसरपंच लक्ष्मी जाधव,पोलीस पाटील नरेश जाधव,ग्रा.प.सदस्य नवनाथ जाधव ,रिपाइंचे सुरेश लोंढे, देवानंद लोंढे, अनिल लोंढे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top