चौसाळा,दि.२५:
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बीड तालुक्यातील चौसाळा शहरातील प्रसिद्ध असलेला जयहिंद महीला गणेश मंडळा तर्फे सर्व सभासदाची गणपती उत्सव 2022 ची नियोजन बैठक घेण्यात आली. बैठक मंडळाच्या माजी अध्यक्षा सौ. वर्षा बाजीराव तिदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत गतवर्षी संपन्न झालेल्या गणेश उत्सवाचे अहवाल पुस्तिकेचे वाचन गतवर्षीच्या कोषाध्यक्षा . कांचन बाळासाहेब खडके ,सौ. सुजाता गणेश गिराम यांनी केले.
या वर्षीच्या जयहिंद महीला गणेश मंडळाच्या नुतन महिला कार्यकरणीची नावे जाहीर करण्यात आले. पुढील प्रमाणे सौ. साधना संदेशशेठ खिंवसरा यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सौ. उज्वला सुदर्शन निनाळे ,सौ. विमल भागवतराव चौधरे ,सौ. लक्ष्मी वैभव सर्वज्ञ, सचिव म्हणून सौ.लक्ष्मी मेघराज चौधरे , सहसचिव म्हणून सौ. माधुरी सिद्धांत आरसुळ ,सौ. रोहिणी महावीर गिराम ,सौ.अश्विनी मन्मथ विधाते , कोषाध्यक्ष कु. कांचन बाळासाहेब खडके ,सौ. सुजाता गणेश गिराम , सहकोषाध्यक्ष सौ. योगिता भारत सर्वज्ञ ,सौ. मेघा रोशन खिंवसरा ,सौ. सोनाली अंकुश तिदार ,सौ. मंगल रामभाऊ खतिले यांची सर्वांनुमते बिन विरोध निवड करण्यात आली.
तरी चौसाळा परीसरातील नावलैकीक मिळवून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गणेश मंडळाने या वर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचे बैठकीत ठरविले आहे .तरी या उपक्रमात प्रमुख्याने किर्तन महोत्सव हा केंद्र बिंदु आहे.या किर्तन महोत्सवात ह.भ.प. नामदेव बापु महाराज कवडे , ह.भ.प. आदिनाथ महाराज लाड ,ह.भ.प. प्रविण महाराज गोसावी,ह.भ.प. सोनाली (ताई) महाराज सागडे , ह.भ.प. भरत महाराज जोगी ,ह.भ.प. साध्वी सोनाली (ताई) महाराज करप ,ह.भ.प. कबीर महाराज अत्तार ,ह.भ.प. दत्तात्रय महाराज अंबिरकर यांची किर्तन सेवा होणार आहे . तर भारूड सम्राट, ह.भ.प. महादेव महाराज शेंडे व सहकारी तुफान कॉमेडी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच बरोबर भव्य रक्तदान शिबीर ,फॅन्सी ड्रेस स्पर्धा ,रांगोळी स्पर्धी ,चिञकला स्पर्धा,सुदृढ बालक स्पर्धा, कृषी मार्गदशन शिबीर सेंद्रीय शेती ,आरोग्य तपासणी शिबीर रक्तदाब व शुगर तपासणी ईत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
यावर्षी विशेष बाब म्हणजे चौसाळा येथील कोविड केअर सेंटर मध्ये सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा भव्य असा सत्कार समारंभ मंडळाच्या वतीने घेण्यात येणार आहे.
या नियोजन बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. गणेश गिराम यांनी केले . तर आभार बाळू नहार यांनी मानले. या बैठकीस जयहिंद नगर मधील सर्व महिला व पुरुष सदस्य , पत्रकार बंधु हजर होते. सर्वांनी नवनिर्वाचित कार्यकारणीचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
तरी चौसाळा व परीसरातील सर्व गणेश भक्तानी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे अवाहन समस्त जयहिंद महीला गणेश मंडळ यांनी केल्याची माहिती मंडळाचे प्रसीद्धी प्रमुख प्रा. गणेश गिराम यांनी पञकाव्दारे दिली.