वागदरी, दि . २४ :एस.के.गायकवाड
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गुजनूरच्या (ता.तुळजापूर ) अध्यक्षपदी सुभाष संगाप्पा मुलगे यांची तर उपाध्यक्षपदी योगेश रमेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दि.२२आँगस्ट.२०२२ रोजी गुजनूर ग्रा.प.च्या विद्यामान सरपंच सुवर्णा व्यंकट साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रमसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत सदर तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी गावच्या उपसरपंच सुनिता सुरज साळुंखे, ग्रामसेवक पी.व्ही. कुंभार, तुकाराम नागमोडे, नागनाथ साळुंखे, हनुमान नागमोडे,माजी सरपंच अण्णाप्पा मुलगे, राजकुमार पाटील, एकनाथ पाटील, सूरज साळुंखे,संतोष पाटील, अनिल साळुंखे, रामचंद्र साळुंखे, रतन साळुंखे, प्रभाकर वाघमारे,आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.