नळदुर्ग ,दि.२३ : 

 नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणेबाबत तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटिल यांनी राज्याचे महसुल , पशुसंवर्धन दुग्धविकास मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोमवार दि.२२  रोजी पञाद्वारे केली आहे.



आमदार राणाजगजितसिंह पाटिल यांनी पञात म्हटले आहे की , तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहराला वैभवशाली इतिहास असून प्राचीन काळी या शहराला अनन्यसाधारण महत्व होते. निजाम काळात विभागीय कार्यालय, जिल्हयाचे केंद्र असा या शहराचा इतिहास आहे. तुळजापूर तालुक्यात १२३ गावे व दोन शहरे असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १४६००९.९२ हेक्टर आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्यातील लोकसंख्या २,२६५२७ आहे.
 

 नळदुर्ग शहराचा इतिहास व तालुक्याचे मोठे भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र नळदुर्ग तालुक्याची अनेक वर्षापासूनची  मागणी आहे. विविध राजकीय पक्ष व संघटनांनी यासाठी आंदोलने देखील केलेली आहेत.या मागणीच्या अनुषंगाने तात्पुरत्या स्वरुपात अप्पर तहसील कार्यालय नळदुर्ग येथे तातडीने सुरू करणेबाबत रीतसर अहवाल शासनाकडे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.
   

त्यामुळे नळदुर्ग तालुका निर्मितीच्या अनुषंगाने योग्य ती प्रक्रिया करण्याचे व तो पर्यंत नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय त्वरित सुरू करण्याचे आदेश संबंधितांना देण्याची  विनंती त्यांनी केली आहे.

 
Top