नळदुर्ग, दि.२२: विलास येडगे

नळदुर्ग येथील महादेव भक्त श्री तानाजीराव भाळे यांनी व्यासनगर येथे महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करून या मंदिरात दि.२१ ऑगस्ट रोजी नविन मुर्तीची मंञोच्चाराच्या जयघोषात , धार्मिक वातावरणात व शिवभक्तांच्या उपस्थितीत   प्रतिष्ठापना  करण्यात आली. 



 मुर्ती प्रतिष्ठापना नळदुर्ग येथील श्री शिवलिंगेश्वर मठाचे श्री. ष.ब्र.बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी अणदुर येथील निलकंटेश्वर मठाचे श्री ष.ब्र.शिवयोगी शिवाचार्य महाराज यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन आशीर्वाद दिले.

        

दि.२० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या नविन मुर्तीची वाजत गाजत व भजन करीत मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत व्यासनगर येथील महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांची संख्या मोठी होती. या मिरवणुकीनंतर नविन मुर्ती मंदिरात ठेवण्यात आली तर जुन्या मुर्तीचे संपुर्ण विधी करून व मंत्रोच्चारात विसर्जन करण्यात आले.
        

दि.२१ ऑगस्ट रोजी सकाळी ११.२० वा नविन मुर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम पार पडला. नविन मुर्ती नळदुर्ग येथील श्री शिवलिंगेश्वर मठाचे श्री ष.ब्र.बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते संपुर्ण विधी करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी संपुर्ण विधी व मंत्रोच्चार अणदुर येथील स्वामी महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
          
 या कार्यक्रमास श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत विष्णु शर्मा महाराज, माजी जि. प.सदस्य बाबुराव चव्हाण, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे बंधु पृथ्वीराजे पदमसिंह पाटील, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, महादेवप्पा आलुरे, माजी नगरसेवक बसवराज धरणे, सुधीर हजारे, सचिन डुकरे, मनसेचे जिल्हा चिटणीस ज्योतीबा येडगे, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी , भाजपचे शहराध्यक्ष धिमाजी घुगे , माजी शहराध्यक्ष पद्माकर  घोडके,  भाजमुयोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे,नवल जाधव, सुरेश गायकवाड, सचिन गायकवाड, संदीप गायकवाड, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे, शिवाजी नाईक, अजित चव्हाण, शिवाजी वऱ्हाडे,बलभीम मुळे, दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्रा मुळे, सौ. काळे, आदीजन उपस्थित होते.
       

 सकाळी सात वाजल्यापासुन धार्मिक कार्यक्रम सुरू होते. सकाळी ११.२० वा.श्री ष.ब्र.बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते मंदिरात नविन मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर भाळे परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर यावेळी स्वखर्चाने मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिरात नवीन मुर्ती प्रतिष्ठापना करणारे महादेव भक्त श्री तानाजीराव भाळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
        

 यावेळी आशिर्वाद देताना श्री ष.ब्र.बसवराज शिवाचार्य महाराज यांनी म्हटले की, शिवधर्म जगात सर्वश्रेष्ठ धर्म आहे. प्रत्येकानी शिवलिंगाची पुजा करावी. भाळे कुटुंबीयांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून नविन मुर्तीची जी प्रतिष्ठापना केली आहे. त्यांचे हे काम पुण्यकर्म असल्याचेही श्री. ष.ब्र. बसवराज शिवाचार्य महाराज यांनी म्हटले आहे. यावेळी श्री स्वामी महाराज व कमलाकर चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमर भाळे,शंकर भाळे यांच्यासह जय हिंद तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शहर पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, आरंभ सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच व्यासनगर मधील नागरीकांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सांयकाळी उशिरापर्यंत भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसुन आले. त्याचबरोबर माजी मंञी मधुकरराव चव्हाण यानीही भेट देवुन दर्शन घेतले.
 
Top