तुळजापूर ,दि.१६:
नवरात्र उत्सवात येणाऱ्या भाविकांची रुग्ण सेवा व्हावी या उद्देशाने Wallace Pharma, मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या सामाजिक दायित्व निधीतून उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे 20 हजार औषधे वाटप तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले यांच्या हस्ते मोफत देण्यात आले.
रुग्णालया तर्फे दिलासाचे प्रतिनिधी प्रणव उन्हाळे, विलास राठोड यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. यावेळी डॉ .हनुमंत होंनमाने,वैद्यकीय अधीक्षक,डॉ.श्रीधर जाधव,सर्व वैद्यकीय कर्मचारी,मनोज चव्हाण,श्रीमंत राठोड,दिनेश राठोड,सुजित जमदाडे,चंदू जोगदंड आदी उपस्थित होते.