काटी,दि.१६:

 रशियाकडून रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र आणि भारतातील दलित, वंचित वर्गातील व्यक्तीचा रशियासारख्या  बलाढ्य राष्ट्राकडून त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याबद्दल व भारतीय व्यक्तीचा सन्मान केल्याबद्दल आजचा हा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त करीत तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे गुरुवार दि. 15 रोजी मिठाई वाटून व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. 
       

यावेळी मंगरुळचे पोलीस पाटील लक्ष्मण माळी-पाटील, अमोल डोंगरे, गुड्डू डोंगरे यांच्यासह मातंग बॉईज, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top