काटी, दि.१६
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील महात्मा फुले शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बालाजी गणेश ढगे तर उपाध्यक्षपदी काशिनाथ हणमंत काळे व तात्यासाहेब नागनाथ चवळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. 13 रोजी संध्याकाळी 9 वाजता झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. महात्मा फुले शारदीय नवरात्र उत्सव समितीचे यंदा हे 41 वे वर्ष आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने मागील दोन वर्ष कुठलेही सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम न घेता नवरात्र उत्सव पार पडला होता. परंतु यंदा निर्बंध मुक्त शारदीय नवरात्र महोत्सव पार पडणार असून महात्मा फुले तरुण मंडळ व शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या आराखड्याची माहिती व बैठकीतील विषयावर सविस्तर चर्चा करुन नवरात्र काळात स्त्री शक्तीचा जागर तसेच विविध धार्मिक कार्यक्रमासह प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मंडळाचे संस्थापक कार्याध्यक्ष निवृत्ती भोजने यांनी सांगितले.
या निवड समितीच्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असून प्रत्येकाकडे शारदीय नवरात्र उत्सवाची जबाबदारी दिली आहे. तसेच नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विद्यासागर ढगे, संस्थापक कार्याध्यक्ष निवृत्ती भोजने व उत्सव समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भाले यांनी केले आहे.
यावेळी संस्थापक कार्याध्यक्ष निवृत्ती भोजने,उत्सव समितीचे नुतन अध्यक्ष बालाजी ढगे, उपाध्यक्ष काशिनाथ काळे, तात्यासाहेब चवळे, बाळासाहेब भाले, सचिन भोजने, संतोष काळे, तानाजी हजारे, ज्योतिराम चवळे, अनिल ढगे, हर्षवर्धन ढगे,शाहिर लाडुळकर, प्रफुल्ल म्हैत्रे, संजय साळुंके,किसन ढगे, विष्णू ढगे, दादासाहेब काळे, प्रभाकर चवळे, गणेश काळे,सचिन घाणे, शाहू बनसोडे, गोकुळ शिंदे, पांडुरंग कवठे,अमोल वेडपाठक,यशवंत काळे, विशाल ढगे आदींसह मंडळातील सदस्य उपस्थित होते.