काटी,दि.२३

तुळजापूर तालुक्यातील काटी केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामधील इयत्ता पहिली ते आठवी वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची शिक्षण परिषद शुक्रवारी (दि. 23) येडेश्वरी कन्या प्रशाला काटी येथे पार पडली.


शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील तिसऱ्या शिक्षण परिषदेमध्ये गुणाकार कार्यशाळा श्री ज्योतिर्लिंग क्षीरसागर, भागाकार कार्यशाळा श्री सोमनाथ जामगांवकर , अध्ययन स्तर निश्चिती गणित व भाषा इयत्ता 6 ते 8 श्री विठ्ठल निचळ  व मराठी वाचन श्री सोलनकर एस व्ही यांनी मार्गदर्शन केले.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही शिक्षण परिषद पार पडली.शिक्षण परिषदेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक काटी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सोलनकर एस व्ही यांनी केले तर आभार केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक श्री अमीन शेख यांनी मानले
 
Top