काटी, दि. २२

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि.२१ रोजी रुक्मिणी फाऊंडेशनच्या वतीने मोफत पशु लम्पी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.


 जनावरांना  लम्पी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी पशुधन मृत्युमुखी पडत असल्याचे समजते.तसेच पशुपालकांना नुकसान सहन करावे लागत आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अडचणीतील पशुपालक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन येथील रुक्मिणी फाऊंडेशनच्या वतीने काटी येथे आयोजित मोफत पशु लसीकरण शिबीरात डॉ.महेश दादासाहेब हंगरकर यांच्या पुढाकाराने जवळपास ८० पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनांचे लसीकरण करुन घेतले.
      


या प्रसंगी पशुपालक काकासाहेब रोडे, दत्तात्रय हंगरकर,किसनराव हंगरकर, संतोष गुंड,संताजी भापकर,सुरेश गुंड,सचिन सावंत,अजय चिवरे,भागवत लोहार,अनिल इंगळे, विष्णू हंगरकर आदी  उपस्थित होते.
 
Top