अणदूर , दि . २4

युक्ता जयंत जोशी ही अगदी चार वर्षाची असतांनाच वडीलांचं छत्र हरवलं,घरचा आधार गेला होता, अचानक वडील गेल्यामुळे घरं पोरकं झालं होतं, जगण्याचा आधार तुटला होता,अशा परिस्थितीत आईने दोन मुलींना पोटाशी धरून,भाऊ,आई वडीलांच्या आधाराने भरपूर शिकवण्याचा व वडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व दुःखाला बाजूला सारुन जिद्दीने आई सिमा जोशी यांनी आपल्या दोन्ही मुलींना उच्च शिक्षण दिलं,मोठी मुलगी सि ए झाली,
युक्ता १ ली ४ थी पर्यंत अणदूर येथील जि प प्रा शाळेत शिक्षण घेऊन, सोलापूर येथील सुयश गुरुकुल, उच्च माध्यमिक शिक्षण लातुर येथे पुर्ण केले, 

अनंत अडचणींवर मात करीत युक्ताचे लक्ष केवळ अभ्यास हेच राहीले,घरच्या परिस्थितीशी सामोरे जाऊन कुटुंबास ऊर्जितावस्था देईल याची खात्री युक्ताला होती त्यामुळे तिने घवघवीत यश संपादित केले आहे,वडील डी सी सी बॅंकेत नोकरीला होते, वडीलांच्या निधनानंतर आईला बॅंकेत नोकरी मिळाली,पण पगार दहा हजार,तेवढ्या पगारीवर दोन्ही मुलींचे शिक्षण, कुटुंबातील अडीअडचणी सोडविण्यासाठी आईला तारेवरची कसरत करावी लागत होती, आपल्या भाच्चीची अभ्यासातील चुणूक पाहुन मामा मदतीसाठी पुढे धावायचा
युक्ताला अभियांत्रिकी क्षेत्रात यश संपादित करायचे होते,

पुणे येथील कमींन्स उमेन्स काॅलेज येथे युक्ताला प्रवेश मिळाला, नियमित, अभ्यास, जिद्द, चिकाटीने युक्ताला अभियांत्रिकी क्षेत्रात यश संपादित करता आले,
जगातील नंबर चौथी फायनान्स डेलोईटे कंपनीने युक्तास बारा लाखांचे पॅकेज दिले असुन,ख-या अर्थाने आईने केलेल्या कष्टाचे चिज झाले आहे,
सतत संघर्ष करत रहायचे आणि यश मिळवायचे हीच आईची शिकवण गिरवत युक्ता जिद्दीची प्रतिक ठरली


 
Top