चिवरी , दि. ०४

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील पोस्टमन  सौ.पूजा विजयकुमार भंडारकोटे व त्यांचे पती गोकुळ बालाजी आलमले यांचा बदली निमित्त सहपत्नीक ग्रामस्थांच्या वतीने सत्कार  करण्यात आला.

मागील चार वर्षापासून भंडारकोटे यांनी चिवरी येथे उत्कृष्ट  सेवा बजावली होती भंडारकोटे यांची होळी ता.औसा येथे बदली झाली आहे, या सत्कार प्रसंगी विकास सोसायटी चेअरमन बालाजी शिंदे, माजी सैनिक विठ्ठल होगाडे, कमलाकर सुर्यवंशी, राम झांबरे, दत्ताञय पाटील, सयाजी लबडे, उध्दव मुळे, अंगणवाडी सेविका लक्ष्मी मेंढापुरे, कल्पना शिंदे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होत.
 
Top