नळदुर्ग , दि. १८ :
हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात भारतीय सैन्याने विजय मिळवला. या लढ्यात महत्वाची भुमिका बजावणा-या नळदुर्ग येथिल बोरी नदीवरील पुल वाचवणा-या शीख रेजिमेंटचे हवालदार बचित्तर सिंह यांचे नावाने हा पुल भविष्यात ओळखला जाईल असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक प्रा. सतिश कदम यांनी केले.
अतिशय दिमाखदार सोहळ्यानिमित्त बोलताना मुक्ती संग्राम लढ्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहिद बचित्तर सिंह यांच्या वंशजांचा शोध घेऊन पुढील वर्षीच्या कार्यक्रमास त्यांना नळदुर्ग येथे बोलवणे व येथे स्वतंञ भारतातील पहिले अशोकचक्र मिळवणा-या बचित्तर सिंह यांचे स्मारक करण्याचा मानस श्री कदम यांनी व्यक्त केला.
नळदुर्ग येथिल माजी नगरसेवक विनायक अहंकारी व मैलारपूर कट्टा मिञमंडळाच्या वतीने ऐतिहासिक आलियाबाद पुलाचे पुजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शरीरावर रोमांच उभे करणारे , थेट मुक्ती संग्राम लढ्याच्या भुमीवर म्हणजे ऐतिहासिक पुलावर सर्वांना खिळवून ठेवणारी शैलीत प्रा. कदम यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मुक्ती संग्राम लढ्यात नळदुर्ग व ऐतिहासिक पुलाचे महत्व विषद केले.
या कार्यक्रमास मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार , माजी नगरसेवक संजय बताले , डाँ. सत्यजित डुकरे, माजी नगरसेवक विनायक अहंकारी , नय्यर जहागीरदार, शिवसेनेचे कमलाकर चव्हाण,
सरदारसिंग ठाकूर, भाजपचे जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भुमकर , श्रमिक पोतदार , भाजपचे शहराध्यक्ष धिमाजी घुगे , माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके,शिंदे गट शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके , माजी नगरसेवक बसवराज धरणे , नितीन कासार, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव , शिवसेनेचे नेताजी महाबोले ,नळदुर्ग शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, पञकार विलास येडगे, शिवाजी नाईक , भगवंत सुरवसे, उत्तम बणजगोळे, दादासाहेब बनसोडे, तानाजी जाधव ,डाँ. दिपक जगदाळे ,अमर भाळे , पांडू पुदाले , महेद्र डुकरे , राजेंद्र महाबोले , बंडू कसेकर , शाम कनकधर , विजयकुमार यादगिरे , गुरुनाथ मुळे , उमेश नाईक , भिमाशंकर बताले, सुदर्शन पुराणिक आदीसह इतिहासप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.
पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नळदुर्गच्या ऐतिहासिक आलियाबाद पुलाच्या पूजनाच्या कार्यक्रम वेळी पुलावर मंडप मारण्यात येणार आहे.
याचा संपूर्ण खर्च शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजीत डुकरे करणार आसल्याचे विनायक अहंकारी यानी सोशल मिडियावर जाहिर केले आहे.