वागदरी, दि. १८ : एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला असून याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थानी केली ग्राम स्वच्छतेची प्रतिज्ञा.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथे ७४ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. तर येथील ग्रामपंचायत कार्यालच्या प्रांगणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ, महिला,विद्यार्थी, युवा कार्यकर्ते यांनी ग्राम स्वच्छतेची शपथ घेतली.
यावेळी उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, ग्रा.प.सदस्य महादेव बिराजदार, दत्ता सुरवसे, बकुलाबाई भोसले, कमलबाई धुमाळ, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष फतेसिंग ठाकूर, ह.भ.प.राजकुमार पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार, सहशिक्षक किसन जावळे, तानाजी लोहार,सहशिक्षिका आरती साखरे,मनिषा चौधरी यासह ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.