अणदुर,दि.१७:

 पशुपालकांनी लंपी रोगाला घाबरून न जाता  संपूर्ण जनावरांना  लसीकरण करावे, त्याचबरोबर सर्व गोठे स्वच्छ ठेवून काही लक्षणे आढळल्यास तात्काळ संपर्क करण्याच्या सूचना यावेळी  अणदुर ता.तुळजापूर  येथील पशुधन विकास अधिकारी कृष्णदेव खाडे यांनी केल्या, 
 

ते आज अणदुर  येथील वत्सलानगर तांड्यावर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औतिच्य साधून साहेबराव घुगे मित्र मंडळाच्या वतीने 500 मुक्या जनावरांना मोफत लंपी लसीकरण उपक्रमाचा  शुभारंभ प्रसंगी बोलत होते .याप्रसंगी ह भ प संतोष झंगे महाराज यांच्या हस्ते गोमातेचे पूजन व ओवाळणी करून मोफत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली .

           
पहिल्याच दिनी 100 मुक्या जनावरांना ही लस देण्यात आली. यावेळी ह भ प संतोष जंगे महाराज यांनी संस्कृत श्लोक पठण करीत पशुधनाचे महत्त्व विशद करून लसीकरण हा जनावरांचा बचाव असून साहेबराव घुगे मित्र मंडळ संकटाच्या वेळी उभारते हे परत एकदा या उपक्रमातून सिद्ध झाले. असल्याचे सांगुन कोरोना काळातील मित्र मंडळांनी 122 दिवस गरजू मंडळींना घरपोच जेवण अभियान राबवून चांगले कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. 
  यावेळी उपस्थित पशुपालकांना लंपी रोगाच्या विषयी जनजागृती पत्रक वाटण्यात आले. 
तसेच साहेबराव घुगे यांनी उपक्रमपर आपले मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. एस एस धायगुडे , डॉ. बी एम खरोसे ,गुंडेषा गोवे, शाहूराज मोकाशे, म्हाळाप्पा घोडके, शिवानंद खुने, प्रसाद देशमुख, अनिल अणदुकर, बापू घुगे, अनिल राठोड, गणेश देवसिगकर, काशिनाथ घुगे, सुरेश चव्हाण, आनंद पवार, रमेश राठोड ,पिंटू चव्हाण, बंडू चव्हाण ,यांच्यासह  उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी ईश्वरी जोशी ,मयुरी  हंगरकर, गीता कदम, यांनी या लसीकरण मोहिमेत सहकार्य केले आहे.
 
Top