मुरुम, ता. उमरगा, दि.१९:
येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत महाविद्यालयाच्या सभागृहात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर मंगळवारी (ता. १८) रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत येणाऱ्या विविध पैंलूवर प्रकाश टाकण्याच्या हेतूने महाविद्यालयीन स्तरावर
एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी एनएपीचे समन्वयक प्रा. डॉ. सुशील मठपती यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : २०२० या विषयावर मार्गदर्शन करताना मल्टिपल एन्ट्री-मल्टिपल एक्सिट, अँकडमीक बँक ऑफ क्रेडीट, कॉन्सिलिंग सेल आणि महाविद्यालयीन स्वायत्तता धोरण यासारख्या विविध विषयावर चर्चा घडवून आणली. या कार्यशाळेच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. किरणसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. राजेंद्र गणापुरे, डॉ. विलास खडके, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. विनायक रासुरे, डॉ. रवी आळंगे, डॉ. भिलसिंग जाधव, डॉ नरसिंग कदम आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. सुजित मठकरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राम बजगिरे तर आभार प्रा. लक्ष्मण पवार यांनी मानले.