उमरगा : लक्ष्मण पवार

उमरगा शहरातील आनंद मंगल कार्यालय महादेव मंदिर सभागृह येथे जिजाऊ ब्रिगेड च्या प्रवक्त्या सौ. रेखाताई नितीन सुर्यवंशी यांच्या वाढदिवसा निमित्ताने निमंत्रितांचे कवी संमेलन मंगळवार दि. 18 रोजी सायंकाळी 7 वा. उत्साही वातावरणात संपन्न झाले. 

यावेळी व्यासपीठावर उमरगा रोटरी क्लब चे अध्यक्ष अजित गोबारे, कवी डॉ. बालाजी इंगळे, अॅड. शुभदा पोतदार, जेष्ठ कवी कमलाकर भोसले व सौ. रेखाताई सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. 

कवी संमेलनात सौ.मिराताई भोसले - चव्हाण, माधव जाधव, प्रविण स्वामी, नितीन सुर्यवंशी,विनोद देवरकर, पुष्पलता पांढरे, भुमीपुञ वाघ, प्रसाद दिवाळी विशेषांकाचे मुख्य संपादक लक्ष्मण पवार, उपसंपादक नसरुद्दीन फकीर, जालिंदर सोनटक्के, समृद्धी इंग्लिश स्कूल चे प्रणेते विकास गायकवाड, बाळासाहेब माने, सा. विश्वविनायक न्युज रिपोर्टर च्या संपादीका सौ. प्रियंका गायकवाड, शिवराम आडसुळ, विश्वनाथ महाजन, करीम शेख, खाजा मुजावर, अमर देशटवार, हणमंत देशमुख, प्रमोद माने, प्रा. लक्ष्मण बिराजदार, सौ. सुवर्णा जगताप, दत्ता काजळे, रमेश मंमाळे, सुधाकर झिंगाडे, सय्यद पाशा रहेबर, शशिकला राठोड, गिरीधर गोस्वामी, नितीन कोराळे,मधूकर गुरव, परमेश्वर सुतार, सुधीर कांबळे, पप्पू सगर, विनोद कोराळे, सचिन शिंदे,पांडूरंग शिंदे आदी कवींनी उपस्थिती लावली होती. 

या संमेलनात कवी भुमीपुञ वाघ यांनी आकांत या कवितेच्या माध्यमातून ........ 

वस्त्यांवरची ज्ञानगंगा
सरकारनं लुबाडीली
पाटी दफ्तर खुंटीला
तान्ही ढोरामागे गेली. 

न्याय कुणाशी मागावा
हक्क हिरावून न्हेली
झोपडी च्या साळमंदी
आवळा पसरली. 

हक्काचे ज्ञान भांडार 
डाके पाडते सरकार
लुटारू च्या या टोळीने
शाळा न्हेली रे चोरून. 

गा-हाणं मांडू कोणापाशी
ज्ञान मंदिर चोरी गेलं
तांडा वाडी वस्तीवर
दिस जोगव्याचं आलं. 

भीमा तुझ्या लेकरांची
उडवीली दाना दान
शेवटच्या लेकराला
कसं मिळेल शिक्षण. 

या कवितेने सुरूवात झाल्याने उपस्थित कविंच्या उत्साहाला उधान आले होते. 

यावेळी सर्वच कवींनी एका कवितेच्या माध्यमातून सम्मेलनात सहभाग नोंदवीत दर्जेदार बनवले. 

कवी अमर देशटवार यांनी..... 
ती आणि मी 
एकाच तटावर बसलो होतो............. 

ह्या कवितेने 35 वर्षापुर्वीचे दिवस आठवल्याचे सांगत रंग भरले. 

कवी प्रमोद माने यांनी झाडे पसरून फांद्या या कवितेने... 

मधल्या सुट्टीत धावायचो
फुलपाखरांच्या मागं
रंगीत ठिपक्याठिपक्यांच्या
तर कधी नकट्यांच्या मागं
जेट विमानासारख्या. 

पुस्तकात ठेवायचो मोरपीस
हळदकुंकू लावून
मोरपिसाला पिल्लू व्हावं म्हणून ... .... .... ... ... 

ही कविता सादर होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. 

या कवी संमेलनाचे सुञसंचलन कवी माधव जाधव यांनी केले.उपस्थितांचे आभार सौ. रेखाताई सुर्यवंशी यांनी मानले .
 
Top