नळदुर्ग, दि. १७
आयुष्मान भारत ही आरोग्याशी निगड़ित महत्वपूर्ण योजना असून,केंद्र सरकारने सन २०१८ साली याची घोषणा केली. परंतु सन २०१०-११ च्या जनगणने नुसार सर्व्हे केल्याचे समजते, वास्तविक पाहता आताच्या जनगणनेनुसार सर्व्हे होणे अपेक्षित आहे, या योजनेसाठी स्वतंत्र सर्व्हे होऊन आर्थिक दृष्टया दुर्बल,गरजुवंत,गरीब लाभार्थ्याचा या योजनेत समावेश व्हावा.
नुकतेच प्रसिध्द झालेल्या नळदुर्ग शहरातील यादीत अनेक गरीब कुटुंबाची नावेच या लाभार्थ्याच्या यादीत नाहीत. हा सर्व्हे नेमका कधी,कसा,कोणत्या आधारे झाला असा प्रश्न नागरिकातुन विचारला जात आहे, त्यामुळे या योजनेचा सर्वसामान्याना लाभ मिळवून देण्यासाठी स्वंतत्र सर्व्हे व्हावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालक मंत्री तानाजी सावंत,जिल्हाधिकारी,आरोग्य सेवा उपसंचालक,जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी आधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,
निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत.
आयुष्मान भारत योजनेच्या यादीत मोठा गैरप्रकार झाला आसुन त्यामध्ये अनेक धनदांडगे , शासकीय कर्मचारी , उदोजक आशा लोकांची लाभार्थी म्हणुन यादीत चक्क नाव आले आहे. ज्याला घर नाही , शेत नाही , शेतमजुर असे अनेकजण या योजनेपासुन वंचित राहिले आहेत. या यदीत बोगस लाभार्थ्याची नावे समाविष्ट करुन शासनाची फसवणुक करणा-याविरुध्द जिल्हाधिकारी यानी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी नागरिकातुन होत आहे.