कळंब, दि.१७ : भिकाजी जाधव

 उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात मध्ये अनंत श्री विभुषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याची जय्यत तयारी झाली आसुन तब्बल  दहा एकरवरील पन्नास हजार भाविक भक्त बसतील असा भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे.


  हि व्यवस्था जिल्हा सेवा व उत्सव सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ ढोकी व परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन सेवा समितीने केले आहे .

ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात  स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुकाचे बिदर येथुन सोमवार दि.17 रोजी रात्री  10 वाजता  ढोकीचे उपसरपंच अमोल अनंतराव समुद्रे या यजमानाच्या घरी आगमन होणार  व तेथेच मुक्काम आसुन मंगळवार दि.18 रोजी सकाळी 8:30 वाजता पादुका रथामध्ये ठेवुन त्याची पुजा आर्चा करुन पादुकाची भव्य मिरवणूक वाजत गाजत फटाक्याच्या आतिष बाजित  निघणार आहे.  पादुका 10:30 वाजता भव्य सभामंडपामध्ये येणार आहे.  या पादुका मिरवणुकीत महिला भक्त डोक्यावर कलस घेऊन तर भक्त हातात भगवे पताके घेवुन सहभागी होणार आहे.  11 वाजता पादुका पुजन आरती ,11 ते 12 सामाजिक उपक्रम, यामध्ये गोर गरीब कुंटुबास सेवा समिती मार्फत 56 शेळ्या उपजिवेकेसाठी सेवा समितीकडुन गरीब कुंटूबां ना  वाटप होणार आहेत. 12 ते 1 पादुका पुजन, 1 ते 2 प्रवचन,2 ते 2:30 महाप्रसाद दर्शन, तर  उपासक दिक्षा ,5:30 ते 6 वाजेपर्यंत  माऊलींना साकडे व फुले टाकणे, 6 ते 8: 30 वाजेपर्यंत दर्शन व सांगता ,वराञी 9 ते 10 वाजता पादुका प्रस्तान नानीजधामकडे, या पादुका दर्शन सोहळ्याची तयारी अंतीम टप्प्यात आली आसुन हा दर्शन सोहळा यशयस्वी होण्यासाठी मराठवाडा लेफ्टनंट जनरल आरविद मोरे, निरिक्षक संजय खंडागळे ,प्रोटोकॉल आधिकारी जयवंत दुबल व दिलीप जाधव यांच्या मार्गदर्नाखाली जिल्हा सेवा समितीचे अध्यक्ष संतोष केसकर व उत्सव कमेटीचे अध्यक्ष दादा सुरवसे  ,जिल्हा कमिटी परिश्रम घेत  आहे. तरी ढोकी  व परिसरातील तसेच उस्मानाबाद,बीड,लातुर,सोलापूर जिल्ह्य़ातील भाविक भक्तांनी पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सेवा समितीचे अध्यक्ष संतोष केसकर,जिल्हा युवा अध्यक्ष राम सगर,महिला जिल्हाध्यक्ष ज्योती  हिबारे ,पीठ लेफ्टनंट जनरल आरविद मोरे ,जिल्हा सेवा समितीचे प्रसिद्धीप्रमुख विलास मुळीक यांनी केले आहे .

 
Top