विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठीच वाद-विवाद स्पर्धांची गरज.... गोविंद पाटील                           

मुरुम, ता. उमरगा, दि. १४ : 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वत:ला ओळखून या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी. महाविद्यालयीन तरुणच उद्याचे भविष्य घडवू शकतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठीच अशा वाद-विवाद स्पर्धांची गरज असल्याचे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी उपसभापती गोविंद पाटील यांनी केले.                         

श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धच्या उद्घाटन प्रसंगी शुरुवारी (ता.१४) रोजी उद्धाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी होते. या वेळी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य महानंदा रोडगे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्रा. डॉ. सतिश शेळके, परिक्षक गुंजोटीचे प्रा.राजाराम निगडे, तुरोरीचे सहशिक्षक गुंडू दुधभाते, मुरुमचे डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. किरण राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती.                

 पुढे बोलताना गोविंद पाटील म्हणाले की, काळाची पाऊले ओळखून तरुणांनी आपली कौशल्ये विकसीत करण्यासाठी प्रत्येक उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला पाहिजे. दिवंगत काकांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेवून जाण्याच्या हेतूनेच या स्पर्धेचे गेल्या २१ वर्षापासून आयोजन करण्यात येत असल्याचे शेवटी ते म्हणाले. या वेळी संस्थेतील २०२०-२१ आदर्श प्राध्यापक डॉ. नागोराव बोईनवाड, प्रा. राजकुमार नाईक, सन २०२१-२२ चा डॉ. किरण राजपूत, प्रा. दयानंद बिराजदार व श्रीमती विजयश्री भालेराव तर सन २०२२-२३ चा डॉ. रवि आळंगे, प्रा. शिवाजी राजोळे व आनंद वाघमोडे आणि रोटरीचा नुकताच पुरस्कार मिळाल्याबद्ल डॉ. सुजित मठकरी यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. अशोक बावगे, डॉ .नरसिंग कदम, डॉ.भिलसिंग जाधव, डॉ. संध्या डांगे, डॉ. प्रतापसिंह राजपूत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोक सपाटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. महेश मोटे यांनी आभार मानले. या वेळी परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.             

फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना गोविंद पाटील, व्यंकटराव जाधव, अशोक सपाटे, महानंदा रोडगे व अन्य
 
Top