नळदुर्ग ,दि.१४ :
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व टोल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अणदुर (ता.तुळजापूर ) ते नळदुर्ग रस्त्याची वाट लागल्याने वाहनचालकासह प्रवाशाना आपला जीव मुठीत घेवुन प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशी व वाहनचालकातुन याप्रकरणी संताप व्यक्त केले जात आहे.
दरम्यान महामार्गाच्या दुरावस्थेमुळे आपघाताची संख्या वाढताना दिसत असुन यापुर्वी महामार्गाची डागडुजी करावे, आपघात टाळावे, याकरिता वेळोवेळी अनेक संघटनानी टोल कंपनीविरोधात आंदोलन केले आहे. माञ याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे अणदुर ,नळदुर्ग,जळकोटपर्यंत हा महामार्ग जागोजागी खराब होवुन पुर्णपणे उखडुन गेल्याचे दिसत आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे बस स्टँड जवळल महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकाना ( प्रवाशाना) आपला जिव मुठीत घेउन गाडी चालवावी लागते हे लक्षात येताच राष्ट्रीय युवा परिषदेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष केदारनाथ पाटील, तुळशीराम घोडके, खंडु टिकबर आदीसह मित्रपरिवारानी महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम केले आहे. फुलवाडी टोलनाका जवळ असुन देखील कोणीही दखल घेतली नसल्याने वाहनचालकात संताप खदखदत आहे. याबाबत प्रशासनाने आता तरी गांभिर्याने लक्ष घालुन तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.