नळदुर्ग ,दि.२६

शहरातील मराठा गल्ली येथे प्रतिवर्षाप्रमाणे यही वर्षी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गुरुवार दि.२७ आँक्टोंबर ते बुधवाला दि.२ नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. पारायणचे हे ४४वे वर्ष आहे. 

वै. श्री .शिवरामबुवा महाराज दिंडेगावकर यांच्या कृपा आशिर्वादाने,वै.तात्यासाहेब वासकर महाराज,वै. हभपमारुती महाराज कानेगाववकर यांच्या कृपेने व भाविकांच्या सहयोगाने हे पारायण होत आहे.

पारायण कालावधीत पहाटे 4ते6 काकडा आरती, सकाळी 6 ते 7 माऊलीची पुजा, 7 ते 9 सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन, 9 ते 9.30 विश्रांती, 9.30 ते 11 वाचन, सकाळी 11 ते 12 भोजन व विश्रांती, 12 ते 2 महिलांचे भजन व भारुडाचा कार्यक्रम, 2 ते 4.30 गाथा भजन, 4.30 ते 5.30 प्रवर्चन, 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 8 भोजन, 8 ते 10 किर्तन, 11 ते 4 पहाटे हरिजागर आदी दररोज कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवार दि. 27 ऑक्टोबर रोजी हभप बलभीम बागल चिकुंद्रा यांचे प्रवर्चन तर हभप मोहन पाटील महाराज किलज यांचे किर्तन होणार आहे. शुक्रवार दि. 28 ऑक्टोबर रोजी हभप संजय पवार शहापूर यांचे प्रवर्चन, हभप राम महाराज गायकवाड चिकुंद्रा यांचे किर्तन तर दि. 29 ऑक्टोबर रोजी हभप अशोक नवगिरे नळदुर्ग यांचे प्रवर्चन व हभप वीरप्राक्ष महाराज कानेगाव यांचे किर्तन, रविवार दि. 30 ऑक्टोबर रोजी हभप बाबुराव पुजारी पाडोळी यांचे प्रवर्चन व हभप महेश महाराज माकणी यांचे किर्तन, सोमवार दि. 31 ऑक्टोबर रोजी हभप अशोक जाधव गुरुजी बाभळगाव यांचे प्रवर्चन व हभप गुरुवर्य आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांचे किर्तन, मंगळवार दि. 1 नोव्हेंबर रोजी हभप राजाभाऊ पाटील वागदरी यांचे प्रवर्चन व हभप गुरुवर्य चैतन्य महाराज वासकर वाशी यांचे किर्तन होणार आहे. तर बुधवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 9 पसायदान हभप गुरुवर्य चैतन्य महाराज वासकर यांचे तर काल्याचे किर्तन हभप श्रीहरी ढेरे महाराज काक्रंबा यांचे होणार आहे. त्यानंतर माऊली पालखी मिरवणुकीस प्रारंभ होईल. पारायण कालावधीत दररोज दानशुर व्यक्तीकडुन अन्नदान करण्यात येणार आहे.

कार्तिक शुध्द चार्तुमास समाप्ती काला महाप्रसाद दि. 8 नोव्हेंबर रोजी कोंडीबा महादेव जाधव यांच्यावतीने करण्यात येणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तानी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचा आवाहन समस्त गावकरी, पारायण समिती व शिवशाही तरुण मंडळ आदीनी केले आहे.


श्री संत ज्ञानेश्वर माऊली 
भजनी मंडळ मराठा गल्ली श्रीरंग भजनी मंडळ नळदुर्ग, श्रीकृष्ण भजनी मंडळ , संत शिरोमणी भजनी मंडळ तोरंबा, महिला भजनी मंडळ सराटी व अणदुर, महिला भजनी मंडळ बोरगाव देशमुख , माऊली भजनी मंडळ, संत मारुती महाराज भजनी मंडळ सलगरा,संत मीराबाई भजनी मंडळ नळदुर्ग
 भारुडाचा कार्यक्रम 

नळदुर्ग, चिकुंद्रा, मुर्टा , संत भजनी मंडळ केशेगाव आदी.
 
Top