तुळजापूर दि 23 : 

तुळजापूर संस्कार भारतीच्या वतीने 26 ऑक्टोबर रोजी दीपावली पाडव्याच्या दिवशी रौप्य महोत्सवी दीपोत्सव आणि रांगोळी रेखाटनाचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी शहरातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

1998 ते 2021 या काळात तुळजापूर संस्कार भारतीच्या वतीने दिवाळी निमित्ताने श्री  तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सव आणि रांगोळी रेखाटण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. यावर्षी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने होणारा रौप्य महोत्सवी कार्यक्रम असल्यामुळे तुळजापूर संस्कार भारतीचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार शेटे यांनी या कार्यक्रमाची विशेष तयारी केली आहे.  प्रफुल्लकुमार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार भारतीच्या वेगवेगळ्या पाच टीम दुपारी तीन वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत मंदिर परिसरात रांगोळ्याचे रेखाटन करणार आहेत. जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर बन्साळी, प्रांत सह चित्रकला प्रमुख शेषनात वाघ, जिल्हा रांगोळी प्रमुख लक्ष्मीकांत सुलाखे, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर मोकाशी, जिल्हा सह कोषाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न कुमार कोंडो, ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीर महामुनी, ज्येष्ठ मार्गदर्शक अविनाश घट, ज्येष्ठ मार्गदर्शक नंदकुमार पोतदार, प्रांत लोककला प्रमुख डॉ. सतीश महामुनी, संगीत विभागाचे संदीप रोकडे, संतोष डोईफोडे, प्रसाद महामुनी, जिल्हा सहमंत्री सौ अपर्णा शेटे, सौ माधुरी कनगरकर, सौ गीता व्यास, सौ अश्विनी कोंडो ,सौ कोमल चव्हाण, सौ सविता भोसले, संजयकुमार बोंदर, नागेश धर्माधिकारी, दीपक कदम, अजय राखेलकर, अनिल आगलावे, ओंकार लसणे, मयूर शेटे ,राज भोरे, एस एन कुलकर्णी, अभिषेक लसणे, महेश कुलकर्णी, रोहन भांजी, बबलू कावरे, यांच्यासह इतर कलावंत या दिपोत्सव आणि रांगोळी रेखाटनेमध्ये सहभागी होत आहेत.

यावर्षी 25 व्या वर्ष असल्यामुळे 1998 मध्ये स्थापन झालेल्या संस्कार भारतीच्या तुळजापूर येथील कलावंतांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. तुळजापूर येथे 1998 मध्ये डॉ. सतीश मामुने यांच्या पुढाकाराने संस्कार भारतीची स्थापना झाली. पहिले समिती निमंत्रक म्हणून डॉ. सतीश महामुनी यांची नियुक्ती होती, त्यानंतर पहिले अध्यक्ष म्हणून सुधीर पेशवे यांची निवड झाली. त्यानंतर सौ मुक्ता गवळी, अंबऋषी शिंदे , पद्माकरराव मोकाशे यांनी तुळजापूर समितीचे अध्यक्षपद या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात भूषविले. नुकतीच  रोप्य महोत्सवी वर्षांमध्ये प्रफुल्लकुमार शेटे यांचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 


शहराच्या कलाक्षेत्रातील वाटचालीमध्ये संस्कार भारती या संस्थेचे योगदान राहिले आहे. शहर आणि तालुक्यातील रांगोळी कलाकारांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी दुपारी तीन वाजता मंदिरात रांगोळी सेवा देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन या निमित्ताने  प्रफुल्लकुमार शेटे यांनी केले आहे.
 
Top