अणदूर, दि.२३
वात्सल्य सामाजिक संस्थेच्या ताई साठी एक साडी उपक्रमाची सुरुवात अणदूर ता.तुळजापूर येथील वत्सलानगर मधील एकल भगिनींना साडी व दिवाळीची फराळ देऊन झाली.
वात्सल्य संस्थेने एकल भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प केला आहे.त्याशिवाय या भगिनींना मोफत औषधे वाटप,राशन किट,मोफत रुग्णवाहिका असेही संस्था उपक्रम राबवते.
दिवाळी हा सर्वांचा आनंदाचा ,मांगल्याचा सण आहे. पण आपल्याच समाजातील असाही वर्ग आहे की, जो रोजच्या पोटा पाण्यासाठी झगडतो तर दिवाळी कुठून साजरी करेल? मागील दोन वर्षापासून वात्सल्य विधवा-परित्यक्ता-गरीब भगिनीमध्ये दिवाळी साजरा करते.यासाठी समाजातील अनेक सूह्रदयी व्यक्ती मदत करतात अणदूर येथील कार्यक्रमात संस्थेचे कार्यकर्ते लक्ष्मण दुपारगुडे,नितीन सरवदे,राहूल कांबळे,किरण कांबळे,सोमानंद मुकरे,विजयकुमार राठोड यांच्या सहकार्यातून स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी बाळासाहेब हंगरगेकर,सौ.सुचिता हंगरगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमासाठी हंगरगेकर कुटुंबीय,श्री.संतोष व्हटकर, गार्डन ग्रुप सोलापूर, नितीन बीबीकर यांचे सहकार्य लाभले