उमरगा , दि.२२

महाराष्ट्राला खूप मोठा आणि अतिशय संपन्न असा सांस्कृतिक वारसा आहे. त्यातील एक भाग म्हणजे लेखन संस्कृती आहे. महाराष्ट्राने जगाला अनेक थोर कवी, लेखक व नाटककार दिले. शब्दांची आणि लेखनाची महती खूप मोठी आहे याची माहिती सर्वदूर व्हावे' यासाठी प्रसाद दिवाळी अंकाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल  दिपक पोफळे यांनी केले. 

ते प्रसाद दिवाळी विशेषांकाचा  प्रकाशन सोहळा शनिवार दि.22.10.2021 रोजी सकाळी 10:30 वाजता रोटरी क्लब च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

 यावेळी व्यासपीठावर डॉ. राजकुमार कानडे,कवी कमलाकर भोसले, प्रसाद दिवाळी अंकाचे संपादक लक्ष्मण पवार, उपसंपादक नसरुद्दीन फकीर यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना डॉ पोफळे म्हणाले की, प्रसाद दिवाळी अंकाने सातत्य ठेवून ग्रामीण भागातील कवी, लेखक यांना लिहिते केले आहे. प्रसाद ने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात व आंद्र प्रदेश या राज्यासह अमेरिकन लेखक कवी यांचे साहित्य या अंकात समावेश आहे. 

प्रकाशन सोहळ्यात युसुफ मुल्ला,कवी भुमीपुञ वाघ, कवी मयुरी जायप्पा,प्रा.अनिल मदनसुरे, प्रविण स्वामी, परमेश्वर साखरे, अमोल पाटील, विकास डि एम एल टी कॉलेज चे प्राचार्य विकास गायकवाड, श्री. चिंचोळे, हरीश कांबळे यांची उपस्थिती होती. 

यावेळी संपादक लक्ष्मण पवार यांनी प्रास्ताविक करून कवी,लेखक,जाहीरातदार व हितचिंतक मिञ परिवार या सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य केले त्याबद्दल आभार मानले. शेवटी उपस्थितांचे आभार  उपसंपादक नसरुद्दीन फकीर यांनी मानले.
 
Top